विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

विवेकानंद महाविद्यालयात गणेशजी शिंदे यांच्या हस्ते स्नेहसंमेलन पार पडणार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षयभाऊ शिसोदे यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती असणार आहे.

त्याचबरोबर विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर दादाराव शेंगुळे ,तसेच अशोक गायकवाड संचालक संगणक विभाग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


स्नेहसंमेलन विवेकानंद महाविद्यालयाच्या पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर खुले रंगमंचावर पार पडणार आहे.
या स्नेहसंमेलनामध्ये  संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले असून जास्तीतजास्त प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com