डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करणार
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
कुलगुरुंच्या वर्षपुर्तीनिमित्त अभिनंदनाचा ठराव
छत्रपती संभाजीनगर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी निमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या वर्षपुर्तीनिमित्त अभिनंदनाचा ठराव व्यवस्थापन घेण्यात आला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि २३) झाली. बैठकीस प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्यासह १८ सदस्य उपस्थित होते. सकाळी ११ः३० ते १ः३० दरम्यान बैठक झाली. या बैठकीत विषयपत्रिकेवरील बारा व ऐनवेळचे सहा अशा अठरा विषयांवर चर्चा झाली. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेची पुर्नरचना करण्याचा निर्णय बैठकीच्या सुरुवातीस घेण्यात आला तसेच संघटनेत माजी विद्यार्थी असलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्यांना सहभागी करुन घेण्याचे ही ठरले.
बैठकीतील महत्वपूर्ण ठराव
भारतीय प्रजासत्ताकाचा अमृतमहोत्सव विद्यापीठातर्फे साजरा करण्यात येईल. यासाठी १० लाखांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अधिसभेत मांडण्यास मान्यता देण्यात आली. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्यकंटेश लांब अर्थसंकल्पाचे वाचन करणार आहेत.
शिक्षकांच्या गोपनीय अहवालाचे नवीन प्रारुप मंजूर करण्यात आले.
लंच होम व सायन्स कॅनटिनचे नवीन प्रस्तााव ’अभिव्यक्ती स्वरास्य’ अंतर्गत मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.
वार्षिक रोखे व लेखा परीक्षण अहवालास मान्यता देण्यात आली.
शिबिरे, कार्यशाळासाठीचा निधी आता विद्यार्थी कल्याण विभागाऐवजी नियोजन विभागामार्फत देण्यात येईल.
स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या वतीने विद्यापीठास ’अॅम्ब्युलन्स’सह १७ लाखांची वैद्यकीय सामुग्री ’सीएसआर’ फंडाचा देण्यात येणार आहे. यासह एकुण अठरा प्रस्तााव बैठकीत चर्चा झाल्याची माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.
कुलगुरुंचे अभिनंदन, अधिकाऱ्यांतर्फे सत्कार
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या कारकिर्दीस २४ जोनवारी रोजी एक वर्षपूर्ती होत आहे. ’नॅक ए प्लस’सह अनेक उत्कृष्ट निर्णय वर्षभरात झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव ऍड दत्तात्रय भांगे व प्राचार्य डॉ भारत खंदारे यांनी मांडला. तर डॉ गजानन सानप व डॉ रविकरण सावंत यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते ठरावास मान्यता देण्यात आली. तसेच दुपारच्या सत्रात अधिका-यांच्या त्रैमासिक बैठकीत कुलगुरु डॉ विजय फुलारी यांचा वर्षपूर्तीनिमित्त प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे व डॉ कैलास पाथ्रीकर यांनी सत्कार केला. वर्षपुर्तीनिमित्त कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बैठकीस वित्त व लेखाधिकारी सविता जम्पावाड, डॉ कैलास अंभुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.