यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ करीता प्रवेश सुरू

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेंतर्गत असलेल्या शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश दिनांक २० जानेवारीपासून फक्त नवीन प्रवेशार्थ्यांसाठी सुरु झालेले आहेत व त्यासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी एड (सेवांतर्गत), बी एड (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी २०२५ या सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी दिली आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. असंख्य खाजगी आस्थापनेमध्ये मानाची पदे भूषवत आहेत. तसेच विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे कृषी आणि इतर क्षेत्रात देखील यशस्वी व्यावसायिक झालेले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे.

बदलत्या काळानुसार व गरजेनुसार विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. याशिवाय विद्यापीठाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे विद्यापीठ दोनवेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य विद्यापीठ, यूजीसी मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठ व नुकतेच शासनाने डिजिटल विद्यापीठ म्हणून घोषित केलेले आहे. तसेच ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव विद्यापीठ आहे.

Advertisement

विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए आय डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम ए, एम कॉम, एम लिब, एम सी ए यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे.

त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारी २०२५ पासून विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेंतर्गत असलेल्या  शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झाले आहेत. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना तथा आनंदाची बाब म्हणजे त्यांना आता नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी घेता येणार आहे. प्रवेशासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या ycmou.ac.in किंवा ycmou.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर किंवा विभागनिहाय अमरावती (९५९५१९७०९९), छत्रपती संभाजीनगर (०२४० – २३७१०६६, ९४२२९४२१७७), मुंबई (०२२ – २३८७४१८७, ९९२२३७९३१९), नागपूर – ९४०३७७४६०७, नाशिक (०२५३ – २३१५७७३, ९४०३७७४७०६), पुणे (०२० – २४४५७९१४, ८३२९२५६७३६), कोल्हापूर (०२३१- २६०७०२२, ९४२३९७९७५०) व नांदेड (९६८९१७४८७८) या क्रमांकांवर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page