श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर: वकृत्व कलेवर बौद्धिक कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर नेतृत्व गुण विकसित करण्याचे केंद्र – डॉ राजीव काळे

बीड : श्री क्षेत्र कपिलधार येथे श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या बौद्धिक क्षेत्रामध्ये वकृत्व कला या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून मराठी विभागाचे डॉ राजीव काळे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा हनुमंत सोट यांची उपस्थिती होती. या प्रसंगी प्रमुख वक्ते यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये नेतृत्व गुण व भाषण कौशल्य विकसित करण्याचे मुख्य व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळत असते यातूनच अनेक नवीन वक्ते निर्माण होतात तसेच विद्यार्थ्यांनी आपली भाषा व स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.

Advertisement
Sri Bankataswamy College's National Service Scheme residential camp concludes with enthusiasm

भाषा प्रभुत्वाने इतरांना प्रभावीत करण्याची क्षमता वाढविण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि महापुरुषांचे चरित्रे डोळसपणे वाचले पाहिजे बघितले पाहिजे तरच आपल्यामध्ये क्षमता विकसित होतात असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा हनुमंत सोट यांनी देखील वकृत्व कला विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वयंसेवक कदम अनिल हरिदास यांनी केले तर आभार स्वयंसेवक शुभम विठ्ठल चव्हाण यांनी मानले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ मनोजकुमार नवशे डॉ शंकर शिवशेट्टे तसेच कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश कोंका कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा राजाभाऊ नागरगोजे, डॉ अरुण दैतकार व बहुसंख्य स्वयंसेवक ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page