नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ सुभाष कोंडावार यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ सुभाष बाबुराव कोंडावार यांची २०२४ साठी प्रतिष्ठित महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे फेलो म्हणून निवड झाली आहे.

प्राध्यापक डॉ सुभाष कोंडावार

डॉ कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली २८ संशोधकांनी Ph D डिग्री प्राप्त केली असून त्यांचे १११ रिसर्च पेपर ख्यातनाम अंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. प्रायोजित कोट्यावधीचे मेजर रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी सफल पूर्णत्वास नेले आहेत. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध राज्यात-विदेशात आयोजित परिषद, संगोष्ठी व कार्यशाळेत निमंत्रित व्याख्याने दिली आहेत. बर्‍याच नामांकित संस्थांचे मानाचे सदस्यपद त्यांच्या नावे आहेत.

Advertisement

विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीसाठी त्यांचे अमूल्य योगदान आणि अथक परिश्रमाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीने फेलो साठी निवड करून त्यांना बहुमान दिला आहे. त्यांचे यश संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाचा क्षण आहे. डॉ कोंडावार यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाने हे सिद्ध केले आहे की, कठोर परिश्रम, चिकाटी आणि ज्ञानाच्या ध्यासाने अविश्वसनीय शक्‍यता साकार करता येतात. विज्ञानाच्या क्षेत्रांत योगदान देऊन डॉ. कोंडावार यांनी आपले स्वप्न साकार केले आहे. डॉ कोंडावार त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठ प्राधिकरणांना देतात कारण विविध यूजीसी आणि डीएसटी प्रायोजित प्रकल्पांतर्गत संशोधन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप प्राप्त झाल्याने डॉ कोंडावार यांचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ ओमप्रकाश चिमणकर यांच्यासह विविध प्राधिकारणींचे सदस्य, सांविधिक अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page