डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा दिवाळीनंतर


ऐनवेळी परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही


छत्रपती संभाजीनगर, दि.२६/१०/०२३ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा मंडळाची १९ ऑक्टोबर रोजी बैठक होऊन वेळापत्रकास मान्यता देण्यात आली.

DR BAMU GATE

यानूसार जून्या अभ्यासक्रमाच्या पदवीच्या सत्र परीक्षा २१ नोव्हेंबर तर नवीन पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा १ डिसेंबर पासून होणार आहे. तर जुन्या व नवीन पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ९ डिसेंबरपासून सुरु होईल तर व्यावसायिक अभ्यासक्रम (२१ डिसेंबर), विधि (२९ नोव्हेंबर), औषधनिर्माणशास्त्र (१ डिसेंबर) व अभियांत्रिकी अभ्यसक्रमाची परीक्षा २९ नोव्हेंबर पासून सुरु होईल, अशी माहिती संचालक डॉ.भारती गवळी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com