राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा वेटलिफ्टिंग पुरुष संघ घोषित 

दक्षिण पश्चिम अंतर विद्यापीठ स्पर्धेत होणार सहभागी 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वेटलिफ्टिंग पुरुष संघाची घोषणा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रभारी संचालक डॉ विशाखा जोशी यांनी केली. आचार्य नागार्जून विद्यापीठ गुंटूर येथे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या दक्षिण पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, RTMNU Nagpur

विद्यापीठाच्या संघामध्ये नॅशनल फायर कॉलेज नागपूर येथील नरेश कुमार (६७ किलो वजनगट), साकेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय गोंदिया येथील देवेंद्र गुर्जर ( ७३ किलो वजनगट), अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय वर्धा येथील यश बोरकर (८१ किलो वजनगट) व अनुप भोगले (१०९ किलो वजनगट) तर यशवंत महाविद्यालय वर्धा येथील तेजस सावळे (१०९  किलो वरील वजनगट) यांचा संघात समावेश आहे.

विद्यापीठाच्या निवड झालेल्या संघाला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com