महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ कार्याध्यक्षपदी डॉ कैलास पाथ्रीकर

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष डॉ कैलास सांडु पाथ्रीकर यांची महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी डॉ कैलास पाथ्रीकर यांची निवड करण्यात आली. याबद्दल कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यापीठ महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची गोंडवाणा विद्यापीठ, गडचिरोली येथे शुक्रवारी (दि १८) बैठक होऊन ही निवड करण्यात आली. राज्य अध्यक्ष अजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

Advertisement

यावेळी सचिव मिलिंद भोसले, सुमित ढोरे, सुनील धिवर, शिवराम लुटे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. डॉ पाथ्रीकर हे १९९६ पासून संघटनेत सक्रीय कार्यरत आहेत. डॉ पाथ्रीकर हे बहिःशाल शिक्षण मंडळाचे संचालक असून सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. या निवडीबद्दल डॉ पाथ्रीकर यांचे कुलगुरु डॉ विजय फुलारी, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ पाथ्रीकर यांच्या रूपाने राज्य विद्यापीठ कार्यकारणीत पहिल्यांदाच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास महत्त्वाचे पद मिळाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page