विद्यापीठात भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला उपकुलसचिव (आस्थापना) मंगेश वरखेडे तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page