नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अध्यासन विभागात ‘लघुचित्रपटाचे’ आयोजन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी पार पडला. पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनातर्फे लघु चित्रपट दाखविण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे व कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत माहेश्वरी, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, आयक्यूएसी संचालक डॉ स्मिता आचार्य, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ प्रफुल्ल साबळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉ विजयालक्ष्मी थोटे, डॉ राजेंद्र काकडे, डॉ मोईज मन्नान हक, डॉ संजय ढोबळे, डॉ सरोज शामकुवर, डॉ संयुक्ता थोरात, डॉ राहुल खराबे, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे यांनी राष्ट्रसंतांना आदरांजली अर्पण केली.

Advertisement

अध्यासन विभागातील सभागृहात राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर आधारित प्रा मनोज विष्णूरकर निर्मित  ‘तुकड्यादास’ हा लघु चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री दीपक इंगळे, विठ्ठल काठोळे, रवी चौधरी, राजकुमार बोके, गणेशराव भारती, मनोज चौधरी, रामराव धारणे, बाबाराव पाटील, सुभाषराव वर्होकार यांच्यासह विभागप्रमुख शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यासन विभागातील शिक्षक डॉ देवमन कामडी, प्रा सुजित जाधव, कल्याणी मेश्राम, छाया खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page