मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांची हिंदी विश्वविद्यालयाला भेट
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था (आयएएस) यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाला भेट देवून विश्वविद्यालयातील अभ्यासक्रम आणि उपक्रमांबाबत चर्चा केली. त्यांच्या आगमन प्रसंगी कुलसचिव डॉ धरवेश कठेरिया आणि अनुवाद व निर्वचन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो कृष्ण कुमार सिंह यांनी शाल व विश्वविद्यालयाचे मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यांनी विश्वविद्यालयातील बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथील पराडकर मीडिया लॅब, गांधी हिल्ससह विश्वविद्यालय परिसराला भेट दिली. महात्मा गांधींच्या नावाने स्थापन झालेला विश्वविद्यालय परिसर पाहून भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वविद्यालया मार्फत चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची तसेच उत्तर परिसरमध्ये स्वामी विवेकानंदांचा 108 फुटांचा पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ धरवेश कठेरिया यांनी दिली.
यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, विश्वविद्यालयाचे राजेश्वर सिंह, डॉ कृष्ण चंद पांडे, सुशील पखिडे, राजेश यादव, बी एस मिरगे उपस्थित होते.