‘उदयन शालिनी फेलोशिप (USF)’ कडून आरोग्य शिबिरात २२३ विद्यार्थिनीची तपासणी

छत्रपती संभाजीनगर : ‘उदयन शालिनी फेलोशिप’ (USF) आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने “रोगनिदान, दंत तपासणी व उपचार महाशिबीर” आयोजित करण्यात आले होते. सुधा बजाज, स्नेहल समीर मुळे आणि शिल्पा शर्मा यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला.

यावेळी सुधा बजाज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ‘उदयन’ म्हणजे उगवता सूर्य. दिल्लीस्थित ‘उदयन केअर’ ही सामाजिक विश्वस्त संस्था १९९४ मध्ये सुरू करण्यात आली. जिथे समाजातील वंचित, आर्थिक आणि दुर्बल घटकांतील निराधारांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेतर्फे भारतातील १३ राज्यातील २२ मुख्य शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवीण्यात येतात. संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये २००८ पासून अल्प उत्पन्न गटातील गरजू व गुणवंत विद्यार्थिनींसाठी दहावी व पुढील उच्च शिक्षणासाठी “उदयन शालिनी फेलोशिप (USF)” ही शिष्यवृत्ती योजना राबवीण्यात येत आहे. सध्या शहरातील ४०० म्हणून अधिक विद्यार्थिनींना याचा लाभ मिळत आहे.

उदयन शालिनीचे प्रमुख वैशिष्ट्ये : मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करून आर्थिक सहाय्य करणे तसेच मानसिकदृष्टया सक्षम करणे, आर्थिक आणि दुर्बल घटकांतील मुलींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समूपदेशनात्मक पालकत्व, मुलींना सामाजिक दायित्व साठी प्रोत्साहित करणे. आम्ही विद्यार्थिनींसाठी दंत, रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबीर घेत आहोत. बऱ्याच विद्यार्थिनींना स्वतःला विकार असून देखील तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जाता येत नाही. अशावेळी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामाजिक चळवळ निर्माण आणि जनजागृती करून त्या विद्यार्थिनीची तपासणी करणे गरजेचे असते.

Advertisement

स्नेहल समीर मुळे यांनी सांगितले की या मुली म्हणजेचं सुदृढ आणि सशक्त भारत निर्मितीचे मूळ आहे. आरोग्य सवंर्धनासाठी आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही कार्य किंवा अभ्यास व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे सर्वांनी आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रत्येक विद्यार्थिनीना आपल्या रक्तगट माहीत असणे फार आवश्यक आहे. गरजू विद्यार्थिनीना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे, म्ह्णून अशा प्रकारचे आरोग्य तपासणी शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील, गरजू विद्यार्थिनींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा ‘उदयन शालिनी फेलोशिप’, छत्रपती संभाजीनगरचा मानस आणि निर्धार आहे.

CSMSS येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत या रक्तगट तपासणी शिबिरात एकूण २२३ विद्यार्थिनींचे रक्त तपासणी करून रक्तगटाची नोंदणी करून त्यांना रक्तगट कार्ड देण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना तारुण्य पणात येणाऱ्या आजाराविषयी तपासणी आणि दंत तपासणी यावेळी करण्यात आली आणि त्यांना आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

CSMSS प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, उपप्राचार्य डॉ जयश्री देशमुख, उपप्राचार्य डॉ विश्वास कदम, रुग्णालय अधीक्षक डॉ नरेश निंबाळकर, विभागप्रमुख डॉ दिपाली आमले, डॉ अविनाश देशमुख, डॉ माधवी गायकवाड, डॉ संध्या यन्नावार, मनुष्यबळ विकास अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page