मुक्त विद्यापीठातील प्रशिक्षनार्थींचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश
शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या (Pre IAS Training Centre) प्रशिक्षनार्थींचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यश
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या (Pre IAS Training Centre) प्रशिक्षनार्थींनी सन २०२३ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यश मिळविले आहे.
यामध्ये शामल कल्याणराव भगत ह्या प्रशिक्षनार्थीस 258 रँक आणि सुरज प्रभाकर निकम यास 706 रँक प्राप्त झाली आहे. सदर प्रशिक्षनार्थींच्या यशाबद्दल मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी त्यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ अनिल कुलकर्णी, स्कूल ऑफ ऑनलाइन लर्निंगच्या संचालक डॉ कविता साळुंके, प्रशिक्षण केंद्राच्या डॉ अजिता शिंदे, मुक्त विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ मधुकर शेवाळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे उपस्थित होते.