IGNOU अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्जास दि.31 जुलै पर्यंत मुदतवाढ


एस.सी. / एस.टी. संवर्गातील विद्याथ्र्यांना सामान्य बी.ए.,बी.कॉम करिता नि:शुल्क प्रवेश

अमरावती – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जुलै, 2023 पासून सुरू झालेल्या सत्राकरिता एम.ए. एम.बी.ए., बी.ए., बी.कॉम.सामान्य, बी.ए.टुरिझम, बी.ए.ऑनर्स, बी.कॉम. (लेखा व वित्त),  पदव्युत्तर पदविका, डिप्लोमा, सर्टिफिकेट  इत्यादी अभ्यासक्रमांकरिता इग्नोच्या www.ignou.ac.in  वेबसाईटवरून प्रवेश अर्ज सादर करण्यास दिनांक 31 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेे.

Advertisement


प्रवेश शुल्क इंटरनेट बँकींग/डेबीट/क्रेडीट/एटीएम कार्डद्वारे भरता येईल. सविस्तर माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबतची माहिती इग्नोचे उपरोक्त वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अनुसुचित जाती व जमाती संवर्गातील विद्याथ्र्यांना  बी.ए. सामान्य, बी.कॉम सामान्य व बी.एस्सी सामान्य अभ्यासक्रमासाठी नि:शुल्क प्रवेश असून अधिक माहितीकरिता इच्छुकांनी इग्नोचे अभ्यासकेंद्र, मुलींचे वसतीगृहाजवळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर येथे सकाळी 8.30 ते 10.30 या वेळात संपर्क साधावा असे डॉ.वर्षा नाठार, समन्वयक, इग्नो अभ्यासकेंद्र, अमरावती यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page