मुक्त विद्यापीठात ‘दिव्यांगाप्रती सुगम्यता’या विषयावर व्याख्यान संपन्न

दिव्यांगाना विविध स्तरावर प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे – धनंजय भोळे नाशिक : भारत सरकार द्वारा दिव्यांग सशक्तीकरण विभागाअंतर्गत दि 3 डिसेंबर 2015 पासून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आलेले आहे. तसेच दरवर्षी मे महिन्यातील तिसरा गुरुवार वैश्विक सुगम्य जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेअंतर्गत कार्यान्वित असलेले दिव्यांग

Read more

मुक्त विद्यापीठातील प्रशिक्षनार्थींचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश

शासनाच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या (Pre IAS Training Centre) प्रशिक्षनार्थींचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यश नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील महाराष्ट्र

Read more

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात (दि 25) सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, कुलसचिव दिलीप भरड, महाराष्ट्र

Read more

इंद्रधनुष्य महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा संघ रवाना

स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास – कुलगुरू प्रा संजीव सोनवणे नाशिक : स्पर्धा या व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे अंग असते. जिंकण्या हारण्यापेक्षा आपल्याला अशा मोठ्या मंचावर प्रतिनिधित्व करायला मिळणे ही मोठी उपलब्धी असते. त्यातूनच विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा पाया रचला जातो, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहभागी विद्यार्थ्यांचा चमू आज रवाना झाला. त्यांना शुभेच्छा देताना प्रा. संजीव सोनवणे बोलत होते. विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रातून निवडलेले विद्यार्थी इंद्रधनुष्य महोत्सवात होणाऱ्या नृत्य, समूहनृत्य, लोकनृत्य, संगीत, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. या स्पर्धा दि. ११ ते १५ मार्च दरम्यान संपन्न होतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या बसला कुलगुरू प्रा संजीव सोनवणे व वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.  याप्रसंगी विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ.  दयाराम पवार यांनी  विद्यार्थ्यांना महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांसमवेत सांस्कृतिक समन्वयक दत्ता पाटील, सचिन शिंदे, डॉ. प्रमोद पवार आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवासाठी मुक्त विद्यापीठाच्या सहभागी विद्यार्थ्यांचा चमू रवाना झाला. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार, सांस्कृतिक समन्वयक दत्ता पाटील, सचिन शिंदे, डॉ

Read more

मुक्त विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कुलसचिव दिलीप भरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग अशा कार्याबद्दल उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले. तर आभार प्रदर्शन कक्ष अधिकारी गणेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.

Read more

You cannot copy content of this page