सौ के एस के महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न

प्रसिध्द समुपदेशक डॉ बसवराज खुब्बा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

बीड : केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयात  दिनांक 21 मार्च 2024 रोजी विद्यार्थी शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथील श्री न्युरोकेअर सेंटरमध्ये न्युरोसायकॉलॉजिकल समुपदेशक आणि विद्यार्थी मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून काम केलेले डॉ बसवराज खुब्बा हे होते. यांनी आजपर्यंत विविध विषयांवर 500 हून अधिक कार्यशाळा घेण्याचा आणि 10,000 हूनअधिक विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केलेल्या डॉ बसवराज खुब्बा यांनी महाविद्यालयात विद्यार्थी, पालक, शिक्षक मेळाव्या दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ बसवराज खुब्बा म्हणाले की, आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपले मन प्रसन्न असणे गरजेचे आहे. त्याबरेाबर सकारात्मक दृष्टीकोन, चांगल्या सवयी, चांगले व्यक्तीमत्वांचे विचार आत्मसात करणे, आपल्या कार्यात सातत्य ठेवा, प्रत्येक संकल्पना मूळापासून समजून घ्या, अपयशाला घाबरून न जाता आपल्या कार्यात झालेल्या चुका सुधारून पुन्हा यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा. इत्यादी विचार पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर ह्या म्हणाल्या की, गोर गरीब व खेडयापाड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना प्रवाहात आनणे हाच संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. मुलांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांच्यावर संस्कार, शिष्टाचार, सामाजिकमूल्ये रूजविण्याची आज नितांत गरज आहे. त्याचबरोबर मुलांना उद्देशून म्हणाले की, आपले आवडीचे क्षेत्र निवडा, शिका, अभ्यास करा, मोठे व्हा, संस्कारशिल बना, वाचन करा महाविद्यालय व आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत.

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ नारायण काकडे यांनी महाविद्यालय नीट, जेईई, सीईटी अशा विविध परीक्षांसाठी राबवत असलेल्या विविध कोर्स व योजनांची माहिती यावेळी दिली.
यावेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ सतीश माऊलगे, पर्यवेक्षक प्रा जालिंदर कोळेकर, डॉ सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ विश्वांभर देशमाने, प्रा राजेश मोराळे, आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page