महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील तलावाचे जल पूजन


जल जीवन आहे; योग्य पध्दतीने वापर व्हावा – कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर

नाशिक : जल हे जीवन आहे. येणाया भविष्यकाळात योग्य प्रकारे जलव्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प.,      अ.वि.से.प., वि.से.प. यांनी विद्यापीठ परिसरातील तळयातील पाण्याचे जलपूजन करतांना केले. या जलसाठयातील पाण्याचा वापर विद्यापीठ परिसारातील उद्याने व वृक्षांसाठी करावा असे  यांनी सांगितले.

Jal Pujan of the lake in Maharashtra University of Health Sciences by hands of VC Kanitkar

 विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे पूर्वी खोदकाम केलेल्या खाणीमध्ये पावसाळयात पाणी साठत असे आजूबाजूच्या टेकडयांवरुन झÚयाच्या रुपात येथे पाणी जमा होई ते पाणी वाहून जात असे. विद्यापीठाने या खाणीला नव्याने अधिक समतल केले, मोठे दगड काढले त्यामुळे अधिक पाणीसाठा व्हायला लागला आहे. या तळयात सुमारे 2.8 कोटी लिटर्स पाणी साठवले जाते. तसेच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ कृ़त्रीम तलाव तयार करण्यात आला असून यामध्ये मोठया प्रमाणत जलसाठा करण्यात येतो. तळयातील साठवलेले पाणी पूर्ण वर्षभर वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Jal Pujan of the lake in Maharashtra University of Health Sciences by hands of VC Kanitkar


        या वेळी विद्यापीठातील जलसाठयाचे मा. कुलगुरु यांच्या हस्ते पूजन करुन श्रीफळ अर्पण करण्यात आले. याप्रसंगी लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, विद्यापीठ हरित कक्षाचे प्रमुख डॉ. सुनिल फुगारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. नंदू सोनजे आदी अधिकारी व कर्मचारी       उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page