एमजीएम विद्यापीठात आंतरराष्ट्रीय तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्यावतीने आज रुक्मिणी सभागृहात ‘एक्सप्लोरिंग अकॅडेमिया – इंडस्ट्री ऑपॉर्च्युनिटी’ या विषयावर आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमेरिक विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ.टोफेल सय्यद यांचे तर ‘विविध क्षेत्रातील विज्ञानाचा उदय’ या विषयावर ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैज्ञानिक डॉ.नानासाहेब थोरात यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या दोन्ही मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, संचालक डॉ. अण्णासाहेब खेमनर, विभागप्रमुख डॉ. संजय हरके, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

Advertisement

डॉ.टोफेल यांनी संवाद साधत असताना भारत आणि आयर्लंड या दोन्ही देशातील संबंधांवर भाष्य केले. त्याचप्रमाणे आयर्लंडमध्ये शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या संधी आणि कॅन्सर सेल निरीक्षणासाठी मायक्रोस्कोप, फोटोटाइप नॅनोस्कोपचे मॉडेल यावेळी त्यांनी सादर केले.डॉ. थोरात यांनी उपस्थितांशी संवाद साधत असताना विविध क्षेत्रातील विज्ञानाचे वाढत असलेले महत्व यावर भाष्य केले. तसेच आयर्लंड येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या संधी, प्रवेश प्रक्रिया, संशोधन आणि शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली.

कुलगुरू डॉ. सपकाळ म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे आंतराराष्ट्रीय शिक्षणाला चालना देणारे धोरण असून एमजीएम विद्यापीठाने ते स्वीकारले आहे. जगभरातील विद्यापीठांशी विविध प्रकारचे सामंजस्य करार करीत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतराराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होत असून फॅकल्टी डेव्हपमेंट, स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम, रिसर्च, जॉईन डिग्री, इंटर्नशिप इ. उपक्रम राबविले जात आहेत. विद्यापीठाने आपले सर्व अभ्यासक्रम हे जागतिक शिक्षणाशी समकक्ष केलेले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page