उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहा विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये नाशिक येथे निवड
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीमध्ये जैवशास्त्र प्रशाळेतील एम एस्सी (मायक्रोबॉयोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री) ह्या विषयांच्या सहा विद्यार्थ्यांची व बांभोरी येथील श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या चार विद्यार्थ्यांची नाशिक येथील बायोलेक्सी एन्झामेस प्रा लि या कंपनीत निवड झाली आहे.
या परिसर मुलाखतीसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या त्यात विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील करणसिंग राजपुत, तन्मय बच्चाव, प्रथमेश खंडारे, हर्षल पाटील, धिरज गिरासे, जयेशकुमार वसावे तसेच श्रमसाधना ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजि, बांभोरी येथील अंकित बोरसे, सुनील चौधरी, चेतन पाटील व शिवम बोहरे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. कंपनीचे व्यवस्थापक राजश्री त्रिभुवन, संचालक यमितकुमार वाणी, प्लेंट हेड सुरेश शिंदे यांनी मुलाखती घेतल्या.
यावेळी जैवशास्त्र प्रशाळेचे डॉ प्रवीण पुराणिक, व विभाग प्रमुख प्रा भुषण चौधरी व जैवशास्त्र प्रशाळेचे प्लेसमेंट समन्वयक डॉ नवीन दंदी उपस्थित होते. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील, जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा अरूण इंगळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.