मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नवोदित कवीच्या पहिल्या प्रकाशित काव्यसंग्रहासाठी विशाखा काव्य पुरस्कार देण्यात येतात. दि १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ आणि १ जानेवारी २०२३ ते १ डिसेंबर २०२३  या  दोन वर्षात ज्या नवोदित कवींचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे, अशा कवींकडून कवितासंग्रह मागविण्यात येत आहेत.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

सन २०२२ आणि सन २०२३ करिता स्वतंत्रपणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन विशाखा काव्य पुरस्कार देण्यात येतील. या पुरस्कार बाबतचा अधिकचा तपशील आणि नियमावली विद्यापीठाच्या  www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Advertisement

त्यानुसार कवींनी आपला कविता संग्रह विद्यापीठात दि ३० जून २०२४ किंवा त्यापूर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन आणि कुलसचिव दिलीप भरड यांच्या सूचनेनुसार, या पुरस्कारासाठी अधिकाधिक मराठी भाषक नवोदित कवींनी आपला पहिला प्रकाशित काव्यसंग्रह पाठवून सहभाग घ्यावा, असे आवाहन कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक प्रा डॉ प्रवीण घोडेस्वार यांनी केले आहे.

कवितासंग्रह पाठविण्याचा पत्ता :

प्रा डॉ प्रवीण घोडेस्वार,

समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गोवर्धन, नाशिक – ४२२२२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page