मुक्त विद्यापीठाचे ‘ड्रोन तंत्रज्ञानावर’ आधारीत शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरु
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर विद्याशाखेअंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानावर आधारीत प्रमाणपत्र शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू झाले असून, प्रवेशाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२४ पर्यंत असणार आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या बदलत्या काळानुसार शिक्षण देण्याच्या संकल्पनेचे एक पुढचे पाऊल म्हणून सदर शिक्षणक्रमाची सुरूवात विद्यापीठामार्फत करण्यात येत आहे.
यामध्ये पुढील प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचा आणि त्या शिक्षणक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या विषयांचा तथा घटकांचा समावेश असणार आहे.
१. ड्रोन प्रणाली परिचय कार्यक्रम (Drone System Introductory Programme (C192))
· ड्रोनच्या कामाची समज
· ड्रोनचे प्रकार
· ड्रोन सुरक्षा
· वर्ग आधारित सत्रे
· सिम्युलेटर फ्लाइंग
२. ड्रोन सिस्टम इंटरमीडिएट प्रोग्राम (Drone System Intermediate Programme (C193)
· एरोनॉटिक्स, रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सची तत्त्वे
· आपले स्वतःचे ड्रोन तयार करा आणि उडवा
· आपले स्वतःचे ड्रोन तयार करा आणि उडवा
· ड्रोन नियम आणि सुरक्षा
· सिम्युलेटर प्रशिक्षण उड्डाण
· वर्ग आणि फील्ड सत्र
३. ड्रोन सिस्टम ॲडव्हान्स कोर्स (Drone System Advance Course (C194) )
· एरोनॉटिक्स, रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मूलभूत गोष्टी
· सानुकूल पेलोड ड्रोन डिझाइन करा, तयार करा आणि उडवा
· उद्योग साधने आणि सेन्सर्ससह हाताने प्रशिक्षण
· नियमन आणि व्यावसायिक अनुप्रयोग
· क्लासरूम, सिम्युलेटर आणि फ्लायड फ्लाइंग सेशन
ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in आणि http://ycmou.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या निरंतर विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम यांनी केले.