विवेकानंद महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा यात्रा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : विवेकानंद महाविद्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने दि 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये देशभक्तीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील हर घर तिरंगा अभियानांतर्गत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकारातून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांच्या सहभागातून तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर शेंगुळे यांनी ध्वज दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी स्लोगन, बॅनर, फलक घेऊन विद्यार्थ्यांनी सावरकर चौक, वरद गणेश मंदिर, एसटी वर्कशॉप मार्गे दीर्घ रॅली काढत विविध विषयावर जनजागृती केली. महाविद्यालयांमध्ये परतल्यानंतर राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.
रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सोमनाथ वांजरवाडे, डॉ वसंत निरस, डॉ आपाराव वागडव, डॉ डी के इंगळे, प्रा राजेंद्र सोरमारे, प्रा. योगेश कातबणे सहभागी झाले होते. यात्रेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ टी आर पाटील, डॉ अरुणा पाटील, प्रा प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.