क्रीडा विभागाचा नावलौकिक उंचावला – कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
शंभरावर खेळाडू, प्रशिक्षकांचा सत्कार
औरंगाबाद : मराठवाडयातील खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून अनेक महत्वाची पदके जिंकुन आणली. क्रीडा विभागाने गत वैभव प्राप्त करुन नावलौकिक उंचावला आहे, असे गौरवोद्गार कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काढले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा बैठकीत ११० खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४८ प्रकारच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजक व वार्षिक क्रीडा वेळापत्रकाचे नियोजनही यावेळी करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन मा.कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता नाट्यगृहात करण्यात आले. बैठकीस प्र-कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ चेतना सोनकांबळे, विभागप्रमुख डॉ कल्पना झरीकर, संचालक डॉ दयानंद कांबळे, तसेच विद्यापीठ क्रीडा मंडळावर नवनियुक्त सदस्य सर्वश्री डॉ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप, व डॉ सुरेश मिरकर आदींची उपस्थिती होती. नाटयशास्त्र विभागात वार्षिक क्रीडा बैठकीत ते बोलत होते.
औरंगाबाद, दि.१७ : मराठवाडयातील खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून अनेक महत्वाची पदके जिंकुन आणली. क्रीडा विभागाने गत वैभव प्राप्त करुन नावलौकिक उंचावला आहे, असे गौरवोद्गार कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काढले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा बैठकीत ११० खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४८ प्रकारच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजक व वार्षिक क्रीडा वेळापत्रकाचे नियोजनही यावेळी करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील विद्यापीठाच्या वार्षिक क्रीडा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन मा.कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता नाट्यगृहात करण्यात आले. बैठकीस प्र-कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ चेतना सोनकांबळे, विभागप्रमुख डॉ कल्पना झरीकर, संचालक डॉ दयानंद कांबळे, तसेच विद्यापीठ क्रीडा मंडळावर नवनियुक्त सदस्य सर्वश्री डॉ उदय डोंगरे, डॉ संदीप जगताप, व डॉ सुरेश मिरकर आदींची उपस्थिती होती. नाटयशास्त्र विभागात वार्षिक क्रीडा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, महाराष्ट्रातील जुन्यापैकी एक आपल्या विद्यापीठातील क्रीडा विभाग आहे. गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात क्रीडा विभागाच्या भरभराटीसाठी अनेक प्रयत्न केले. खेळाडू, प्रशिक्षणाच्या मानधनात वाढ करण्यात आली. जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यात आला . सिंथेटिक ट्रॅक हा महत्वपूर्ण प्रकल्प मंजूर झाला असून लवकर सुरू होईल. तसेच स्कुबा डायव्हिंग व लाईफ गार्ड हे नवीन अभ्यासक्रमही प्रस्तावित आहेत . विद्यापीठातील मैदान व हॉल या मधून आर्थिक स्त्रोतही वाढले आहेत . राज्य व राष्ट्रीय स्पर्धात अनेक खेळाडूंनी पारितोषिके जिंकली. तलवारबाजीच्या खेळाडूंनी तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली. राज्य क्रीडा महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन केले. दोन दशकानंतर पहिल्यांदाच विद्यापीठाला चॅम्पियनशिप मिळाली. एकंदर आपल्या कारकिर्दीत विद्यापिठाच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न केला याचा मनस्वी आनंद आहे, असेही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले या वेळी म्हणाले.
बैठकीत मा. कुलगुरू यांच्या हस्ते मागील शैक्षणिक वर्षातील खेलो इंडिया, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, क्रीडा महोत्सव आदी स्पर्धांमधून नावलौकिक प्राप्त एकूण ११० खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक आदींचा ब्लेझर देऊन गुणगौरव करण्यात आले.
गुणवंत खेळाडू, प्रशिक्षक पुढीलप्रमाणे :
१. खेलो इंडिया आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धा – तुषार अहिर, दुर्गेश जहागीरदार, शाकेर सय्यद, ऋषिकेश शेळके, निखिल वाघ, प्रशिक्षक डॉ पांडुरंग रनमाळ
२. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल पुरुष स्पर्धेत पात्र व क्रीडा महोत्सव स्पर्धेत प्रथम स्थान – सोमवंशी प्रल्हाद, शेख शोएब, शेलेटकर कौशिक, मारोती हसूल, सय्यद मुशारफ, मुहसीन एन.एस., मोहंमद अन्सार, पावन पवार, अॅलन वर्गीस, जीवन पवार, रेजिन बाबू, लक्ष्मण धोत्रे, प्रशिक्षक अभिजित दिख्खत, व्यवस्थापक डॉ गोविंद कदम, डॉ महेश निंबाळकर .
३. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी पुरुष स्पर्धेत पात्र व क्रीडा महोत्सव स्पर्धेत प्रथम – राम आढागळे, अक्षय सूर्यवंशी, रोहित बींनीवाले, सुरेश जाधव, कृष्णा पवार, आकाश चव्हाण, सिद्धेश पाटील, भूषण तपकीर, अल्केश चव्हाण, राहुल शिरोडकर, सिद्धेश तटकरे, पठाण जावेद खान, प्रशिक्षक डॉ माणिक राठोड, डॉ वसंत झेंडे, व्यवस्थापक .
४. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो-खो पुरुष स्पर्धेत पात्र व क्रीडा महोत्सव स्पर्धेत प्रथम- संकेत कदम, अविनाश देसाई, गणेश बिशेट्टी, मंडल राहुल, अवधूत पाटील, सुशांत कालढोणे, सुरज लांडे, विजय शिंदे, रोहित चव्हाण, हृषीकेश मुर्च्छावडे, सुयश गरगटे, शेंगल गजानन, लेखन चव्हाण, गौरव जोगदंड, राजपाल निकाळजे, प्रशिक्षक डॉ रफिक शेख, व्यवस्थापक डॉ कपिल सोनटक्के .
५. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो-खो महिला स्पर्धेत व क्रीडा महोत्सव स्पर्धेत द्वितीयस्थान – ऋतुजा खरे, गौरी शिंदे, किरण शिंदे, गायकवाड वैभवी, ऐश्वर्या पेठे, प्राची जेटनुरे, निकिता पवार, जानवी पेठे, आरती कांबळे, प्रियांका भोपी, सलोनी बावणे, पूजा सोळंके, भक्ती कुलकर्णी, शाम्भवी पाटील, कोमल बनसोडे, प्रशिक्षक अनिता पारगावकर, संघ व्यवस्थापक श्री काकासाहेब, डॉ जि सूर्यकांत, डॉ सचिन देशमूख, डॉ युसूफ पठाण .
६. क्रीडा महोत्सव कबड्डी महिला स्पर्धेत द्वितीयस्थान – मयुरी गाढवे, प्रिया चुंगडे, हर्षाली थोरात, आरती ससाणे, नम्रता सोनवणे, शीतल घुंगसे, शुभांगी वाबळे, वसुधा माने, वैभवी बिरादार, रीमा चौहान, कदम मेघा, सुवर्ना लोखंडे, प्रशिक्षक डॉ राणी पवार, व्यवस्थापक डॉ प्रशांत तौर.
क्रीडा महोत्सव बास्केटबॉल पुरुष स्पर्धेत प्रथम स्थान- शुभम ठेंगे, स्वप्नील ढोबळे, अजय पवार, साहिल धनवटे, गणेश कुसाळकर, नरेंद्र चौधरी, सत्यजित परदेशी, राजेश्वर परदेशी, अभिषेक अंभोरे, शुभम गवळी, अभयसिंग हजारी, शुभम लाटे, प्रशिक्षक डॉ सय्यद जमीर, व्यवस्थापक डॉ शेखर शिरसाठ .
७. क्रीडा महोत्सव ऍथलेटिक स्पर्धेत नावीण्यप्राप्त- रामेश्वर मुंजाल, सोनाली पवार, सुरेखा आडे, स्नेहा मदने, प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, व्यवस्थापक सीमा मुंढे,
बैठकीत दुपारच्या सत्रात डॉ शत्रुंजय कोटे, डॉ मकरंद जोशी व डॉ बाबू आदींचे व्याख्यान झाले. तसेच बैठकीत प्रामुख्याने, विद्यापीठाच्या क्रीडा शुल्कात व क्रीडा महोत्सव शुल्क, आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयक, जिल्हानिहाय स्पर्धेसाठी तांत्रिक समितीचे गठन, तक्रार निवारण समितीचे गठन व चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी आंतरमहाविद्यालीय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तसेच स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयांना वितरण करणे आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली . डॉ. अभिजित दिख्खत व डॉ. माधव इंगळे यांनी सुत्रसंचालन तर डॉ. मसूद हाश्मी यांनी आभार मानले . बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ क्रीडा विभागातील शिक्षकेतर कर्मचारी सर्वश्री प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, अभिजित दिख्खत, किरण शूरकांबळे, गणेश कड, रामेश्वर विधाते, मोहन वाहिलवार, लेखन स्लामपुरे आदींनी परिश्रम घेतले. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबदल क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, संघ व्यवस्थापक डॉ.सचिन देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.