दत्ता मेघे उच्च  शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ राष्ट्रीय महोत्सवात स्पर्धांचे आयोजन  

स्कूल ऑफ अलाइड सायन्सेसद्वारे द नेक्स्टजन एक्स्पो


वर्धा 
– दत्ता मेघे उच्च  शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील स्कूल ऑफ अलाइड सायन्सेसद्वारे गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी द नेक्स्टजन एक्स्पो राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी या महोत्सवात युवावर्गाकरिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  या एक दिवसीय राष्ट्रीय महोत्सवात द नेक्स्ट जनरेशन लिडर, शार्क टँक बिझनेस प्लॅन, बिझनेस क्विझ, द माईंड ऑफ टुमारो, पोस्टर मेकिंग, अॅड मॅड शो इत्यादी स्पर्धा होणार आहेत. 

Advertisement
DMIHER Logo Datta Meghe University Wardha Logo

महोत्सवाचे प्रायोजकत्व गुगल डेव्हलपर स्टुडन्टस् क्लबने स्वीकारले असून विजेत्यांना रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा संयोजन समितीत प्रा. प्रवीण भगत, प्रा. डॉ. मायकल, प्रा. निलेश मुंजे, प्रा. डॉ. विजयेंद्र शाहू, प्रा. रुपाली नगराळे, प्रा. चेतन परळीकर यांचा सहभाग आहे. महोत्सवात सहभागी होण्याकरिता आर्यन काळे  (8459824749) किंवा रोहित पटेल (7261869044) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्कूल ऑफ अलाइड सायन्सेसच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पंकजकुमार अनावडे व महोत्सव प्रमुख डॉ. दीपक शर्मा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page