रायसोनीचा विद्यार्थी आकाश मस्तूदला टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब (टीआयएच) डीएसटी फेलोशिप

पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आकाश मस्तुद याला आयआयटी बॉम्बेच्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब (टीआयएच) फाउंडेशनकडून २०२४-२५ साठीची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपमुळे त्यांला दरमहा रु ३०,००० पुढील एक वर्षापर्यंत मानधन मिळणार आहे. आयओटी सक्षम एनआयसीयू मॉनिटरिंग सिस्टमद्वारे नवजात शिशुंची काळजी घेण्यासाठीचा प्रकल्प आकाश याने सादर केला होता. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला व फेलोशिपसाठी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ आशा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

रायसोनी कॉलेज पुणेचे, कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर म्हणाले, हे अनुदान एनआयसीयुमधील नवजात मुलांची सुरक्षा आणि काळजी घेण्यासाठी डिझाइन केलेली अत्याधुनिक मॉनिटरिंग सिस्टम विकसित केली आहे. याच्या अंमलबजावणीसाठी आकाशच्या प्रयत्नांना रायसोनी कॉलेज मदत करेल.

इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख डॉ व्ही एम पांचाळे आणि इनोव्हेशन आणि इनक्युबेशनचे प्रमुख डॉ स्वप्नील महाजन यांनी अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहाय्य केले ज्यामुळे विद्यार्थी मस्तुद यांना ही प्रतिष्ठित फेलोशिप मिळवण्यात यश मिळाले.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी विद्यार्थी आकाश मस्तुद याच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page