महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी चंद्रपुरात विविध विद्यापीठांचे संघ दाखल
आजपासून सामने रंगणार
चंद्रपूर : चंद्रपूर व बल्लारपूर येथे होणाऱ्या 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी विविध विद्यापीठांचे संघ चंद्रपुरात दाखल झाले असून आजपासून विविध क्रीडा स्पर्धांचे सामने रंगणार आहेत.

सदर महोत्सवाचे यजमानपद गोंडवाना विद्यापीठाकडे असल्याने या सर्व महोत्सवाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. दि 18 फेब्रुवारी ते दि 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये चंद्रपूर आणि बल्लारपूर परिक्षेत्रामध्ये आयोजित असून मुले व मुली यांचे कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स व चेस अशा 8 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत.
कबड्डीचे सामने आरएसएसएस, विसापूर येथे खो-खो आरएसएसएस, विसापूर येथे व्हॉलीबॉल आरसीईआरटी, चंद्रपूर येथे बास्केटबॉल चंद्रपूर सैनिक स्कूल, विसापूर येथे बॅडमिंटन जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर (बॅडमिंटन हॉल) येथे टेबल टेनिस तालुका क्रीडा संकुल, विसापूर, (बॅडमिंटन हॉल) येथे ॲथलेटिक्स तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे तर चेस आरसीईआरटी, चंद्रपूर (इन हॉल) येथे आयोजित करण्यात आलेल आहेत. हे सर्व सामने सकाळी 7:00 ते दुपारी 12:00 व सायंकाळी 4:00 ते रात्री 9:00 अशा दोन सत्रांमध्ये रंगणार असून सर्व उपांत्य व अंतिम सामने हे दि 21 फेब्रुवारी 2025 रोजी होतील.