इंद्रधनुष्य महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा संघ रवाना
स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास – कुलगुरू प्रा संजीव सोनवणे नाशिक : स्पर्धा या व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे अंग असते. जिंकण्या हारण्यापेक्षा आपल्याला अशा मोठ्या मंचावर प्रतिनिधित्व करायला मिळणे ही मोठी उपलब्धी असते. त्यातूनच विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा पाया रचला जातो, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहभागी विद्यार्थ्यांचा चमू आज रवाना झाला. त्यांना शुभेच्छा देताना प्रा. संजीव सोनवणे बोलत होते. विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रातून निवडलेले विद्यार्थी इंद्रधनुष्य महोत्सवात होणाऱ्या नृत्य, समूहनृत्य, लोकनृत्य, संगीत, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. या स्पर्धा दि. ११ ते १५ मार्च दरम्यान संपन्न होतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या बसला कुलगुरू प्रा संजीव सोनवणे व वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी विद्यार्थ्यांना महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांसमवेत सांस्कृतिक समन्वयक दत्ता पाटील, सचिन शिंदे, डॉ. प्रमोद पवार आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवासाठी मुक्त विद्यापीठाच्या सहभागी विद्यार्थ्यांचा चमू रवाना झाला. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार, सांस्कृतिक समन्वयक दत्ता पाटील, सचिन शिंदे, डॉ
Read more