डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये

साळोखेनगर : शिवाजी विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ साठी घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये साळोखेनगर येथील डॉ डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 22 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये डाटा सायन्स विभागाची रेवती पाटील, सिव्हीलची अस्मिता मोरे, इलेक्ट्रिकलची भक्तीभावना कोळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे 5 विद्यार्थी,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे 2 विद्यार्थी,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे 5 विद्यार्थी व डाटा सायन्सचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आले.

महाविद्यालयाच्या डाटा सायन्सच्या रेवती पाटील (प्रथम), दिशा शिंदे (द्वितीय), मयुरेश भंडारी (तृतीय), पियुष काटकर (चौथा), श्रेयश फणसाळकर (पाचवा), पियुषा साजणे (सहावा), राफिआ मुल्ला (सातवा), अपूर्वा देसाई (आठवा), ख़ुशी माने (नववा), स्वरूप पाटील (दहावा), सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अस्मिता मोरे (प्रथम), मेघा पाटील (तृतीय), वैष्णवी गुंजवटे (आठवा), पूजा यादव (नववा), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या भक्तीभावना कोळेकर (प्रथम), दिव्या तिबिले (चौथा), संध्या सुतार (सातवा), नम्रता पाटील (नववा), प्रसाद जाधव (दहावा) तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या अनिकेत चव्हाण (सहावा) व शिवम चौगले (दहावा) यानी गुणवत्ता यादी मध्ये स्थान मिळवले आहे.

Advertisement

गेल्या 11 वर्षांपासून संस्थचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील व उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगती होत आहे. संस्थेमध्ये राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल, शाहुवाडी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, तसेच कोल्हापूर शहरातील सुमारे 1200 विद्यार्थी शिकत आहेत, अशी माहिती कॅम्पस संचालक डॉ अभिजित माने यांनी दिली.

शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता हा एकमेव निकष असून महाविद्यालयातील प्राध्यापक नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून अध्यापन करत आहेत, याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ सुरेश डी माने यांनी केले.

यावेळी डी वाय पी ग्रुप च्या विश्वस्त देवश्री पाटील यांनी भेट देऊन गुणवत्ता यादी मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

संस्थचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री नामदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ सुरेश डी माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page