मिल्लीया महाविद्यालयात “विद्यार्थी संवाद” उत्साहात संपन्न
बीड : मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय येथे अहमदबिन अबूद करिअर एज्युकेशन सेंटर, करिअर कट्टा व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांचा संयुक्त विद्यमाने “विद्यार्थी संवाद” आयोजित करण्यात आला होता. या वेळी यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. करिअर कट्टा मार्फत उपलब्ध संधी आणि करिअर नियोजन बाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केला. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचे एसआयपी करावे व दररोज इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यासा साठी वेळेचे नियोजन करावे अशी कल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा मार्फत उपलब्ध संधी चा भरपूर उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. या वेळी आनंदराव धोंडे महाविद्यालय कडाचे प्राचार्य डॉ विधाते, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ काळे, डॉ नरसाळे, उपप्राचार्य डॉ हुसैनी एस एस, नॅक समन्वयक डॉ अब्दुल अनिस, प्रा मोमीन फसीउद्दीन, डॉ खय्युम फारुकी, डॉ अब्दुल रहीम, डॉ मिर्झा असद बेग, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
संवादाचे आयोजन महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक तथा अहमद बिन अबूद करिअर एज्युकेशन सेंटरचे डायरेक्टर डॉ मोहम्मद आसिफ इकबाल व डॉ शेख हुसैन यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.