शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा कृ कणबरकर पुरस्कार जाहीर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा प्राचार्य रा कृ कणबरकर पुरस्कार पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव यांना पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. प्राचार्य रा कृ कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभ, शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये गुरूवार, दि २५ एप्रिल, २०२४ रोजी सायं ०४:०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई हे उपस्थित राहणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रा डॉ दिगंबर शिर्के हे भूषविणार आहेत. प्र-कुलगुरू प्रा डॉ प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ विलास शिंदे हे या प्रसंगी उपस्थित राहतील.