देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये निवड

देवगिरी इंजिनिअरींग व मॅनेजमेंट स्टडीजच्या कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरींग विभागाच्या ४ विद्यार्थ्यांची निवड

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल संचलित देवगिरी इन्स्टीटयूट ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज मधील कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या परीसर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रु लाखाचे वार्षीक पॅकेज मिळाले, ही मुलाखत ऑनलाईन घेण्यासाठी कंपनीचे एच आर आणि अॅडमीन विभागाचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थीत होते. या परीसर मुलाखतीमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेकनिकल रांऊड आणि एच आर रांऊड अशातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वेक्षक आणि विविध विभागामध्ये काम करण्याची संधी मिळेल.

अफान मोहम्मद, साईनाथ गोरे, नरेन पोपळे, ऋषिकेश मालानी या निवड झालेल्या विद्यार्थाचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके, सचिव सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने, विभागप्रमुख प्रा संजय कल्याणकर, डॉ सत्यवान धोंडगे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ राजेश औटी, डॉ सचिन बोरसे, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा अमरसिंह माळी व प्रा प्रवीण महाडीक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com