अमरावती विद्यापीठात संत गाडगे बाबा विचार साहित्य संमेलनाचे आयोजन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राच्या वतीने येत्या 26 मार्च, 2024 रोजी सकाळी 10:30 वा संत गाडगे बाबा विचार साहित्य संमेलनाचे डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ सतिश तराळ हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ गणेश पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्ही एम मेटकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनात प्रा एम टी देशमुख, माजी नगरसेवक प्रदीप बाजड, भरत रेळे, प्रकाश महात्मे, कैलास बोरसे, राजकुमार चर्जन, संदीप राऊत, अरूण शेवाळे, संतोष अडसोड, उत्तमराव भैसने, गजानन भारसाकळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या व्दितीय सत्रात ‘संत गाडगे बाबांचे अलौकीक कार्य’ या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थान डॉ मनोज तायडे भूषविणार आहेत. परिसंवादामध्ये डॉ काशिनाथ ब-हाटे, डॉ गणेश चव्हाण, प्राचार्य अरविंद देशमुख, डॉ प्रफुल्ल गवई, डॉ मंदा नांदुरकर, डॉ राजेश मिरगे हे विचार मांडतील. त्यानंतर दुपारी 3:30 वा. ज्येष्ठ कवी बबन सराडकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. यावेळी डॉ. सुखदेव ढाणके, विष्णू सोळंके, अनंत नांदुरकर, डॉ. ममता इंगाले, डॉ. प्रमोद गारोडे, सुनिल यावलीकर, प्राचार्य जयश्री तोटे, निलिमा भोजने, प्रकाश आमले, रविंद्र जवादे, संदीप वाकोडे, पवन नालट, प्रा. गजानन निंघोट, अजय धोटे, विनोद तिरमारे, प्रा. गजानन हिरोळे, प्रा.गजानन बनसोड, डॉ. संघमित्रा खंडारे, गणेश साखरे, बबलू कराळे, संजीवनी काळे, प्रियंका गिरी, रंजना कराळे, शितल राऊत, छाया पाथरे, पौर्णिमा सवाई, अलका ताथोड, सिमरेला देशमुख, जयश्री कोडगिलवार हे आपल्या कविता सादर करतील.
सूत्रसंचालन डॉ हेमंत खडके हे करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5.30 वा. होणा-या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ सतिश तराळ भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, विद्यापीठाच्या मराठी-हिंदी विभागप्रमुख तथा मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक डॉ. भोजराज चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यासन केंद्राचे प्रमुख व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. दिलीप काळे यांनी केले आहे.