संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा २५५.७२ कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर


अर्थसंकल्पात ६३.३६ कोटीची तुट

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा २०२५-२६ चा २५५.७२ कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर करण्यात आला. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ व्ही एच नागरे यांनी हा अर्थसंकल्प अधिसभेमध्ये सादर केला. अर्थसंकल्पात १९२.३६ कोटी रुपये प्राप्तीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ६३.३६ कोटी रुपयाची तुट यामध्ये दर्शविण्यात आली आहे. कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृति अधिसभा सभागृहामध्ये आज अधिसभेची बैठक संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे तर सभागृहात सर्व सन्माननीय अधिसभा सदस्य उपस्थित होते.

सन 2025-26 चा अर्थसंकल्प एकून तीन भागात विभागलेला आहे. परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प,योजना, सहयोग कार्यक्रम अनुदाने यानुसार तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये परिरक्षणासाठी 187.40 कोटी, विकासाकरिता 36.85 कोटी, स्वतंत्र प्रकल्प/योजनांकरिता 31.47 कोटी रुपयाची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

विद्यापीठाला केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून अऩुदान व विविध शुल्क प्राप्त होत असते. यावर्षी अंदाजित एकूण प्राप्ती 192.36 कोटी रुपये होणार असल्याचा अंदाज अंदाजपत्रकात नमूद करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात परिरक्षणांतर्गत अर्थसंकल्पीय वर्षामध्ये 73 कोटी 25 लक्ष 25 हजार एवढ्या अनुदान प्राप्तीचा/ तर 75 कोटी 50 लक्ष एवढ्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 2025-26 या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये परीक्षा शुल्कापासून 47 कोटी, 45 लक्ष 25 हजार इतक्या शुल्कप्राप्तीचा तर परीक्षेसाठी 50 कोटी 92 लक्ष एवढ्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय वर्षात रुपये 3 कोटी 70 लक्ष 30 हजार शुल्कप्राप्तीचा अंदाज पदव्युत्तर शैक्षणिक विभागासाठी करण्यात आला असून 6 कोटी 15 लक्ष 46 हजार खर्च दर्शविला आहे.

ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी अर्थसंकल्पीय वर्षात रुपये 4 लक्ष 60 हजार एवढ्या प्राप्तीचा, तर पाक्षिके, नियतकालिके तसेच प्रशासकीय खर्चासाठी रुपये 1 कोटी 56 लक्ष 15 हजार एवढी तरतूद करण्यात आला आहे.
क्रीडा व शारीरिक शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय वर्षात रुपये 2 कोटी 69 लक्ष 29 हजार प्राप्तीचा,तर 3 कोटी 71 लक्ष 59 हजार एवढ्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सर्वसामान्य सेवा व प्रशासकीय व्ययासाठी या अर्थसंकल्पीय वर्षात रु. 42 कोटी 49 लक्ष 31 हजार एवढ¬ा खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विद्यार्थी परिषद कार्यक्रम व विद्यार्थी विकास निधी अंतर्गत 64 लक्ष 52 हजार एवढ्या खर्चाचा, शिक्षक व कर्मचारी कल्याण निधीसाठी रु 47 लक्ष प्राप्तीचा अंदंाज आहे. तर रु 47 लक्ष 57 हजार एवढ्या खर्चाचा अंदाज आहे.

आपत्ती नियोजन निधीसाठी रु 4 कोटी 74 लक्ष प्राप्तीचा, तर रु 0.5 कोटी 30 लक्ष खर्चाचा अंदाज आहे.

विद्यार्थी सुरक्षा विमा निधी, दान निधी, संत गाडगे बाबा अध्यासन निधी, युएसआर निधी अंतर्गत रु 64 लक्ष 20 हजार एवढ्या प्राप्तीचा तर 63 लक्ष 93 हजार एवढ्या खर्चाचा अंदाज आहे.

विकासासाठी रु 36 कोटी 84 लक्ष 50 हजार एवढी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

विद्यापीठाने निकाय निधी (कॉर्पस फंड) उभारलेला असून या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये 1 कोटी 51 लक्ष एवढा निधी जमा होईल असा अंदाज आहे. घसारा निधीमध्ये या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये प्रत्येकी रु 9 कोटी एवढा निधी जमा होईल असा अंदाज आहे. स्वतंत्र प्रकल्प किंवा योजना किंवा सहयोग कार्यक्रम अनुदानांतर्गत या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये रुपये 30 कोटी 56 हजार एवढ्याअनुदान प्राप्तीचा अंदाज असून 31 कोटी 47 लक्ष इतक्या खर्चाचा अंदाज आहे.

Advertisement

अर्थसंकल्पाची वैशिष्टे :

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात वेतन आणि भत्त्यांच्या तरतुदीत सुमारे 55 कोटी रुपयांची घट करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
परीक्षा सुधारणासाठी 9 कोटी रुपये आणि प्रशिक्षण, उद्योजकता विकास, कौशल्य विकास, संशोधन इत्यादींसाठी 87 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रातील औषधोपचारांसाठी 7 लाख 30 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठ स्तरावरील संशोधन निधी योजनेसाठी 50 लाख रुपये आणि आरजीएसटीसी अंतर्गत 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे संशोधकांना आर्थिक मदत मिळेल.
मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नेट कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षक आणि कर्मचारी कल्याण निधीसाठी 47 लाख 57 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थी सुरक्षा विम्यासाठी 42 लाख 35 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ई-गव्हर्नन्स आणि प्रशिक्षण :

ई-गव्हर्नन्ससाठी 50 लाख रुपये आणि शिक्षक-कर्मचारी प्रशिक्षणासाठी 5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

संशोधक आणि विद्यार्थ्यांना ग्रंथालयीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या ग्रंथालयीन सुविधा पुस्तके, उपचार, उपकरणे, नियतकालिके व पाक्षिकांसाठी अर्थसंकल्पात 2 कोटी 76 लाख 15 हजार रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे.

बुलढाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयाच्या विकासासाठी 1 कोटी 63 लाख 91 हजार रुपये आवर्ती खर्चासाठी आणि 3 लाख 30 हजार रुपये अनावर्ती खर्चासाठी देण्यात आले आहेत.
आपत्कालीन नियोजनांतर्गत विविध कार्यक्रम व शिबिर आयोजनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
विद्यापीठाने सामाजिक उपक्रमांसाठी 5 लाख 3 हजार रुपयांची तरतूद केली आहे.
विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागासाठी 14 लाख 80 हजार रुपये मंजूर केले आहेत.
विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 11 लाख 17 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाला पीएम-उषा योजनेअंतर्गत बांधकाम, नूतनीकरण आणि उपकरणे खरेदीसाठी 20 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे,

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे :

परिरक्षणासाठी 187 कोटी 40 लाख रुपये, विकासासाठी 36 कोटी 85 लाख रुपये आणि स्वतंत्र प्रकल्प/योजनांसाठी 31 कोटी 47 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या वर्षीची एकूण अपेक्षित प्राप्ती 192 कोटी 36 लाख रुपये आहे, तर एकूण खर्च 255 कोटी 71 लाख रुपये आहे. त्यामुळे अर्थसंकल्प 63 कोटी 35 लाख रुपयांनी तुटीचा आहे.
परीक्षा आणि परीक्षा सुधारणांसाठी 50 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रशासकीय विभागांसाठी उरस्कर, उपकरणे, संगणक व तत्सम साहित्य आणि सॉफ्टवेअरसाठी 5 कोटी 93 लाख 54 हजार रुपये, तर शैक्षणिक विभागांसाठी 1 कोटी 77 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभागांसाठी एकूण 6 कोटी 15 लाख 46 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ज्ञानस्त्रोत केंद्र आणि निवासी ज्ञानस्त्रोत केंद्राच्या खर्चासाठी 3 कोटी 36 लाख 15 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थी परिषद कार्यक्रम निधी आणि विद्यार्थी विकास निधीसाठी 64 लाख 52 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिसरात बांधकाम आणि नूतनीकरणासाठी मेजर वर्क अंतर्गत 19 कोटी 50 लाख रुपये आणि मायनर वर्क अंतर्गत 6 कोटी 47 लाख 20 हजार रुपये ची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उद्यान देखभालीसाठी 1 कोटी 44 लाख 26 हजार रुपये आणि इमारत, रस्ते आणि क्रीडांगणे देखभालीसाठी 1 कोटी 43 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page