उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त गीतगायन व  काव्यवाचन स्पर्धा संपन्न

जळगाव : रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेअंतर्गत असलेल्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने गीतगायन व  काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. व्य.प. सदस्य डॉ. पवित्रा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील अध्यक्षस्थानी होते.

Advertisement
KBCNMU-GATE

सुकन्या जाधव आणि माधुरी जाधव यांना विभागून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. अमृता महाजन द्वितीय तर राखी शेंडगे हिने तृतीय क्रमांक मिळवला. दामिनी पाटील व गोपाल पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. परीक्षक म्हणून डॉ. अभय मनसरे, डॉ. बाळासाहेब सुर्यवंशी यांनी काम पाहिले. डॉ. पवित्रा पाटील नितीन सांगवी व डॉ. उमेश गोगडीया यांच्या हस्ते पारीतोषिके देण्यात आली. डॉ. विजय घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. सुकन्या जाधव हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉ. समाधान बनसोडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page