कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या युनिकनेक्ट ऍपचे कुलगुरू प्रो. त्रिपाठी यांच्या हस्ते उद्घाटन

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे युनिकनेक्ट अॅप हे विश्वविद्यालयाला समाजाभिमुख करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल – प्रो. हरेराम त्रिपाठी

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्रातील भाषा विद्यापीठ असले तरी या विश्वविद्यालयाचे संपूर्ण कामकाज हे डिजिटाईज्ड आहे. कर्मचा-यांच्या नोंदणीपासून ते विद्यार्थ्यांच्या नोंदणीपर्यंत, विविध प्रकारच्या ऑनलाईन सेवांपासून ते ऑनलाईन आर्थिक व्यवहारापर्यंत, ऑनलाईन पीएचडी मुलाखतीपासून विविध प्रकारच्या ऑनलाईन कार्यक्रमांपर्यंत शैक्षणिक, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक सर्व स्तरांवरील कार्यामध्ये विश्वविद्यालयाने डिजिटाईज्ड कामकाज स्वीकारले आहे. कोणतेही विद्यापीठ हे विद्यार्थी केंद्रीत असतेच परंतु बदलत्या आधुनिक युगानुसार विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची माहिती, सूचना, अभ्यासकम, विविध प्रकारचे आवेदन, प्रश्नपत्र, इ. तत्काळ सेवा उपलब्ध करून देता यावी यासाठी विश्वविद्यालयाने एक युनिकनेक्ट अॅप विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी तयार केले आहे.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि टेक्नोस्पक्ट्रा एड्टेक यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थी, महाविद्यालये तसेच अन्य संबंधितांना जोडण्यासाठी युनिकनेक्ट अॅपची निर्मिती करण्यात आली. बुधवार, दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी या अॅपचे उद्घाटन कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, टेक्नोस्पेक्ट्रा एड्टेक चे टेक्नोस्पेक्ट्रा एड्टेक चे संस्थापक शुभम पाटील, सोहम खराबे व मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज अग्रवाल, प्रो. प्रसाद गोखले, संचालक, विद्यापीठ नियोजन विकास मंडळ, प्रो. कविता होले, अधिष्ठाता, डॉ. जयवंत चौधरी, परीक्षा नियंत्रक, डॉ. दीपक कापडे, ग्रंथपाल, विजयेंद्र पांडे समन्वयक सामंजस्य करार व उपकुलसचिव, डॉ. रेणुका बोकारे, जनसंपर्क अधिकारी तसेच जयेश बागडे इ. प्रामुख्याने उपस्थित होते. युनिकनेक्ट अॅप तयार करणारी चमू ही युवा असून ते स्वतः अभियंता आहेत. यंग एन्टरप्रिनर्स असलेले सोहम खराबे, शुभम पांडे, जयेश बागडे आणि सूरज अग्रवाल यांच्या चमूने तयार केलेल्या अॅपची मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनीही प्रशंसा केली. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले, ‘या अॅपद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात असलेल्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाशी साक्षात् संपर्कात राहील. या अॅपद्वारे विश्वविद्यालयाद्वारे देण्यात येणा-या सुविधा अधिक प्रभावी व परिणामकारक पद्धतीने देता येतील.’ कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे युनिकनेक्ट अॅप हे विश्वविद्यालयाला समाजाभिमुख करण्यासाठीचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. युनिकनेक्ट अॅपमुळे विद्यार्थ्यांना विश्वविद्यालयाशी एककेंद्री संपर्क आणि विश्वासार्ह माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

Advertisement

या अॅप ने विश्वविद्यालयाची आवश्यक माहिती, सूचना देण्यासाठी एक तंत्रसक्षम व्यासपीठ अॅप रूपाने निर्माण झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक, प्रशासकीय सूचना व माहितीचे आदान-प्रदान प्रभावी रीतीने करता येईल. विश्वविद्यालयाशी सर्व संलग्नित महाविद्यालये आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे आणि प्रभावी संपर्क राहणे हा अॅप तयार करण्यामागचा उद्देश आहे. या अॅपमुळे विद्यार्थ्यांना विश्वविद्यालयाशी एककेंद्री संपर्कासह विश्वासार्ह माहिती अधिकृतरित्या प्राप्त होणार आहे.

अँड्राईड मोबाईल हा आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात आहे. अॅप स्टोअर तर उपलब्ध आहेच, ते कसे हाताळायचे हेही माहित आहे. या अॅपच्याच साहाय्याने विद्यापीठ आता विद्यार्थ्यांच्या हातात येणार आहे. युनिकनेक्ट या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील. विश्वविद्यालयासंबंधित सर्व माहिती, सूचना, आवेदने, अभ्यासकम, प्रश्नपत्रिका, निकाल, हॉल तिकीट, इ. अन्य शैक्षणिक, प्रशासन स्तरावरील महत्त्वाच्या सूचना एका क्लिक च्या साहाय्याने उपलब्ध होतील. विद्यार्थीकेंद्रीत असलेल्या या अॅपवर संलग्नित महाविद्यालये देखील जोडली जातील. या सर्व सुविधा एका अॅपच्या माध्यमातून विकसित करून हे अॅप विद्यार्थ्यांच्या सेवेत लवकरच दाखल झाले आहे. विद्यार्थी हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर मधून डाऊनलोड करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page