‘स्वारातीम’ विद्यापीठातील पुरुषोत्तम कुलकर्णी, कऱ्हाळे आणि पठाण सेवानिवृत्त
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाचे सहा. कुलसचिव पुरुषोत्तम अरविंदराव कुलकर्णी, आस्थापना विभागातील सहा अधिक्षक राम नारायण कऱ्हाळे आणि वाहन चालक सिद्धिकखान शेरखान पठाण हे तिघेही ३० एप्रिल रोजी नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ३० एप्रिल रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी तिन्ही सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ सुर्यकांत जोगदंड यांची विशेष उपस्थिती होती.
पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी विद्यापीठाला २८ वर्षे सेवा दिली आहे. विद्यापीठातील आस्थापना विभाग, परीक्षा विभाग, शैक्षणिक विभागातही त्यांनी आपली सेवा दिली. यापूर्वी विद्यापीठाने उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले.
सहा. अधिक्षक राम कऱ्हाळे हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. कऱ्हाळे यांनी कनिष्ठ लिपिक पदापासून ते सहा. अधिक्षक पदापर्यंतची अशी एकूण २७ वर्ष सेवा त्यांनी विद्यापीठास दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शैक्षणिक मान्यता विभाग, अभ्यास मंडळ, शैक्षणिक संलग्नीकरण, पदव्युत्तर विभाग इ विभागामध्ये आपली सेवा दिली.
विद्यापीठातील वाहन चालक सिद्धिकखान पठाण हेही नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे.
या समारंभ कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी या तिन्हीही कर्मचाऱ्यास त्यांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले आणि त्यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही या सर्वांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ जगदिश कुलकर्णी यांनी केले.