शिवाजी विद्यापीठात पं. आमोद दंडगे यांची तबला वादन कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर : २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठ, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये प्रसिध्द तबला वादक, गुरु व तबला अभ्यासक पं. आमोद दंडगे यांची दोन दिवसीय तबला वादन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये त्यांनी लय-लयकारी, तालशास्त्र, रियाज संकल्पना, तिहाई व चक्रदार सौंदर्य तत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर तबल्याच्या घराण्यांतील विविध बंदिशी व तिहाईतील भाषा सौंदर्ययांवर विवेचन केले. तबला वादनातील साथ संगत या विषयांतर्गत विविध ठेके व त्यांचे लय अनुरूप वादन यावरआपले विचार प्रकट केले. तबल्यातील व्याकरण, लघु-गुरुविचार, पेशकार विचार तसेच तबल्यातील पढंतचे महत्त्व इ. महत्तवपूर्ण अंग सोदाहरण प्रस्तुत केले. तबल्यातील विविध सौंदर्यतत्त्वेयांवर पंडितजींनी सखोल चिंतन प्रस्तुत केले. संगीतकले मध्ये तबला वादनाचे तसेच तबला तालवाद्याचे स्थान व महत्त्व विशेष रूपाने प्रकट करत त्यातील सर्व अंगांचे महत्त्व विशेद केले.
या संपूर्ण कार्यशाळेसाठी अधिविभागातील विद्यार्थांबरोबरच कोल्हापूर व आसपासचा भागातील अनेक तबला वादक तसेच कोल्हापुरातील प्रसिद्ध तबला वादक गिरीधर कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते. कार्यशाळेची सुरवात सरस्वती पूजनाने झाली. अधिविभागाच्यावतीने विभागप्रमुख डॉ. निखिल भगत यांनी पं. आमोद दंडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. विनोद ठाकूर देसाईयांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. सचिन कचोटे यांनीपाहुण्यांचा परिचय करून दिला. या संपूर्ण कार्यशाळेचे विक्रम परिट , संदेश गावंदे, अतुल परिट, मल्हार जोशी यांनी नेटके व्यवस्थापन केले.