रायसोनी महाविद्यालयाच्या प्रा रचना साबळे यांचा ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान
पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआयएमएल विभागाच्या प्रमुख प्रा रचना साबळे यांना शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीईच्या सहकार्याने ब्रेनव्हिजनद्वारे नुकतेच प्रतिष्ठेच्या ज्येष्ठ आचार्य भारत शिक्षण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बीईईए (BEEA) पुरस्कार 2024 समारंभात प्रा रचना साबळे यांना एआयसीटीई (AICTE), नवी दिल्लीचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ बुद्ध चंद्रशेखर आणि आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठात झाला.
देशभरातून आठ हजारांहून अधिक नामांकन प्राप्त झाले होती. निवड समितीने शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्णता काम करणाऱ्या विविध श्रेणींमध्ये 300 प्रोफाइल निवडले.
डॉ आर डी खराडकर म्हणाले की, बीईईए अवॉर्ड्स २०२४, शिक्षणाद्वारे भविष्य घडवणाऱ्यांना आणि शैक्षणिक क्षेत्रात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित सन्मानीत करण्यात येते. प्रा रचना साबळे यांची कामगिरी उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवते आणि शैक्षणिक समुदायासाठी प्रेरणा दर्शवते.
रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी, आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्याकारी संचालक श्रेयश रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी प्रा रचना साबळे यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.