हिॅदी विश्वविद्यालयाचे प्रा डॉ दिगंबर तंगलवाड यांची मराठी समाजशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेवर निवड
वर्धा : नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिॅदी केंद्रीय विश्वविद्यालय वर्धा येथील ‘स्त्री अध्ययन केंद्राचे प्राध्यापक तथा क्षेत्रीय केंद्र प्रयागराज येथील अकादमिक निदेशक प्रो. डॉ. दिगंबर तंगलवाड यांची विद्यापीठ सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मराठी समाजशास्त्र परिषदेचे 33 वे राष्ट्रीय अधिवेशन हिंगणघाट जि. वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. या परिषदेत झालेल्या आम सभेत डॉ. तंगलवाड यांची एकमताने सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या आमसभेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्रो. जगन कराडे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईचे डॉ.संपत काळे, पुणे विद्यापीठाचे डॉ.संजय कोळेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिष्ठाता प्रो. संजय साळुंखे व विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण सिंग साळोक, नागपूर विद्यापीठाचे डॉ. अशोक बोरकर, नाशिक विद्यापीठाचे डॉ. नारायण चौधरी, गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. पाटील, नांदेड विद्यापीठाचे डॉ. बाबुराव जाधव व डॉ. नारायण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दिलीप खैरनार व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांनी काम केले.
डॉ. तंगलवाड यांच्या निवडीमुळे त्यांचे मित्र डाॅ.रामचंद्र भिसे, डॉ. संदीप गोरे, डॉ.मारोती बामणे,डॉ.बिभिषण करे, डाॅ.डी.के.कदम, डाॅ.सुखदेव चव्हाण, डॉ.माधव आनेराव, डॉ.भरत कांबळे, डाॅ. विलास चव्हाण, डॉ.बाबुराव जाधव. प्रा.प्रकाश कोथळे, डॉ. श्रीनिवास पिलगुलवार, प्रा.सी.टी.कांबळे, डॉ. नानासाहेब पाटील, डॉ दत्ता तंगलवाड, डॉ.भालेराव कळमनुरी यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या निवडीबद्दल महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भीमराय मेत्री, कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया, अधिष्ठाता डॉ. अखिलेश दुबे, परीक्षा नियंत्रक कादर नवाज खान, दूरशिक्षण निदेशालयाचे निदेशक डॉ. आनंद पाटील, डॉ. बालाजी चिरडे, डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. विपीन पांडे, डॉ. सूर्यप्रकाश पांडे, बी. एस. मिरगे, प्राचार्य डॉ. माधव बसवंते तसेच प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.