नामवंत डिझायनर प्रविणसिंग सोलंकी यांची एमजीएम विद्यापीठातील स्कूल ऑफ डिझाईनला भेट

सर्व विद्यार्थी प्रतिभावान, त्यांना प्रोत्साहन मिळावे – नामवंत डिझायनर प्रविणसिंग सोलंकी

छत्रपती संभाजीनगर : सर्व विद्यार्थी प्रतिभावान असतात. शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात आणि त्यांच्याकडून प्रतिभा घेण्यासंदर्भात जागरूक राहणे आवश्यक असते, असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन- एनआयडी अहमदाबादचे नामवंत डिझायनर अर्थात रचनाकार प्रा प्रविणसिंग सोलंकी यांनी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईनला त्यांनी भेट दिली, त्यावेळी सोलंकी बोलत होते.

Advertisement

शिक्षकांनी स्वतः शिस्त पाळणे अत्यावश्यक असते तसेच त्यांनी आपल्या स्वतःच्या कामाच्या स्वतः योग्य नोंदी ठेवणे आणि त्या स्वतः प्रभावीपणे मांडणे महत्त्वाचे असते, असे त्यांनी यावेळी शिक्षकांना उद्देशून नमुद केले. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास उपयोगी पडते. शिक्षकांनी विद्यार्थी आपापसात सहकार्य करतील याकडे लक्ष द्यावे. त्यांना साधनसामुग्री उपलब्ध करुन द्यावी. त्यांना विचार करायला प्रवृत्त करावे. त्यांना नवनवे प्रयोग करू द्यावे. त्यांना अपयश पचविण्यासाठी सज्ज करावे पण त्याची पुनरावृत्ती होऊ नये या संदर्भात जागरुक रहावे. विद्यार्थ्यांना सहलीला नेणे वगैरेंसारख्या उपक्रमातून त्यांचा विकास घडवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

जागतिक पातळीवर `हॅंगर मॅन` अशी त्यांच्या बांबूच्या हॅंगरमुळे ओळख मिळवलेले सोलंकी यांनी यावेळी रचनाकार अर्थात डिझायनरने भ्रमंती करण्यावर भर द्यावा. त्याची स्पर्धा कोणाशी आहे, याची त्याला माहिती हवी, अशी माहितीही दिली. एमजीएम विद्यापीठातील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक उपक्रमांबद्दल सोलंकी यांनी प्रशंसोद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page