एमजीएमच्या प्रा.उषा शेटे यांना पीएचडी प्रदान
छत्रपती संभाजीनगर, दि.१६ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका उषा शेटे यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. शेटे यांना पीएचडी प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा.शेटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.सय्यद अझरुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऍन इम्पिरिअल स्टडी ऑन कंप्यूटर टेक्नॉलॉजी लर्निंग इन ग्रॅज्युएट स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र’ हा विषय घेऊन आपली पीएचडी पूर्ण केली आहे. पीएचडी पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद असून मी घेतलेल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याची भावना प्रा. शेटे यांनी यावेळी व्यक्त केली.