अटलजी…!

राजकारणातील भिष्म , कधीही चारित्र्यावर दाग लागू न देणारे,वेळ प्रसंगी राज धर्माचे पालन करावयाची आठवण करुन देणारे, राजकिय निवृत्ती नंतर हस्तक्षेप न करणारे, हळवे मनाचे कवि, अगात ईच्छा शक्तीच्या जोरावर विरोधकांवर मात करणारे, कमल का फुल ला देश भरात ओळख देणारे अटलजीं यांच्या आत्म्यास शांती लाभो.

२०१४ साली केंद्रात मोदी सरकार आले होते त्या साली कश्मिरात आलेल्या पावसाने जनजिवन उद्वस्त झाले होते.आम्ही आठ दिवस कश्मिरात वैद्यकीय शिबिर घेत खेडोपाडी फिरत होतो.अनंतनाग,शोपिआन,पुलवामा,राजोरी,उरी,बांदिपुरा,पुंछ या पुरग्रस्त भागात वैद्यकीय सेवा देत असताना तेथिल नागरिकांकडून अटलजी यांच्याबद्दल खुप आदर दिसुन येत होता.प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत स्थानिक रस्ते जे सुधरले आहे त्याचे श्रेय ते अटलजींना देत,कश्मिरीयतला ओळखणारे तेच आहे असे ते म्हणत.

त्यांच्या कार्यकाळात झालेले अणु चाचणी , कारगिल युद्ध हे आपला देश सार्वभौम आहे दाखवून दिले.अंतराष्ट्रीय राजकारणात देशाला एक आदर्श ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे.सर्व शिक्षा अभियान हे देशाला साक्षर करण्यासाठी उचललेले पाउल होते.तहलका ने केलेल्या स्टिंग आॕपरेशनमूळे भ्रष्टाचार चे आरोप झाल्यावर तत्कालीन संरक्षण मंत्री जार्ज फर्नांडिस यांना राजीनामा देण्यास दबाव टाकणारे पंतप्रधान अटलजीच होते.दहशतवाद प्रतिबंधक कायदा सर्वप्रथम अटलजींनीच मांडला होता पण आघाडी असणार्या घटक पक्षांचा यास विरोध झाल्यामूळे त्यांनी हि कायदा मागे घेतला गेला.

२००२ ला झालेल्या गोध्रा दंगली नंतर त्यांनी वक्तव्य केले होते “जिथे मुस्लिम बहुसंख्य आहे तिथे शांततेत जगू ईच्छित नाही” राष्ट्रपती के आर नारायण याची गंभीर दखल घेतली होती.राज्य सरकारला या बाबत राजधर्म न पाळल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भर सभेत कान टोचले होते.२००५ साली राजकिय संन्यास घेतल्या नंतर मुंबईत झालेल्या सभेत आपले वारस म्हणून प्रमोद महाजन व लालकृष्ण आडवाणी हे राम लक्ष्मण असतील असे जाहिर केले होते.

Advertisement

शेजारील देशांशी संबंध सुधारण्यावर भर देत १९९९ साली दिल्ली – लाहोर बस सेवा सुरु केली.दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होऊन संबंध दृढ करण्याचा संकल्प त्यांनी केला होता.   २००३-०४साली भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान दौर्यावर खेळावयास पाठविले.भारतीय संघाला “खेल ही नही दिए ल जित के आओ” चा शुभेच्छा संदेश दिला होता. पण काही केल्या दहशतवाद काही कमी होत नव्हता.२००१ ला संसदेवर हल्ला झाला.हल्यात त पाकिस्तानी नागरिक असल्याचे सिद्ध झाले.

संसदेत व्यथित होत ते म्हणाले कि पाकिस्तान शी सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही शेजारील संबंध सुधारणा होत नाही.कारगिल युद्धाच्या दरम्यान अमेरीकी अध्यक्ष बिल क्लिंटन यांना एक गुप्त पत्र लिहीत सांगितले कि पाकिस्तानी घुसखोर यांना आम्ही सीमा रेषेपार जाऊन पळवू अथवा अणु बाॕम्ब चा वापर करु .

अटलजींच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा वाढिस लागल्या यामूळे जीडिपी ६-७% पर्यत गेला होता.सार्वजनिक क्षेत्रात खाजगीकरण करत आधुनिकीकरणाची सुरवात याच काळात झाली.नवाख्या असणार्या माहिती तंत्रज्ञानाची (IT) खरी गरज ओळखुन या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे काम अटलजींच्या कार्यकाळात झाले.उद्योग स्नेही वातावरण निर्माण करुन परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे काम , शेती तसेच पाणी साठी मोठ्या प्रमाणावर कामे हातात घेतली गेली. लोकसभा २००४ च्या निवडणूकात India Shining या स्लोगनवर लढवल्या गेल्या.पण रालोआ ला घरचा रस्ता दाखविण्यात आला.आपला पराभव मान्य करत विरोधी पक्ष हे घेण्यास नकार दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लवलेशही पंतप्रधान पदावर त्यांनी पडू दिला नाही. संघ,पक्ष व पंतप्रधान ही प्रत्येक जबाबदारीची सरळमिसळ न करता पार पाडली.हे त्याचे विशेष गुण दिसुन येतात.

२०१५ साली मोदी सरकारने अटलजींना भारतरत्न या पुरस्काराने सम्मानित केले.

उतार वयामूळे पक्षघातचा झटका त्यांना
आला होता.तद्नंतर हळूहळू ते विसराळू होत चालले होते.व्हील चेअर च्या आधारेच त्यांचे बाकी जीवन जगत होते.अनेक वर्षापासुन असणारा मधुमेह त्यांना त्रास देत होता.त्यामूळे सार्वजनिक कार्यक्रमात जाणे त्यांनी नेहमी टाळले.११ आॕगस्ट रोजी त्यांना एम्स (All India institute of Medical Science ) मध्ये भरती करण्यात आले होते.त्यांचे नेहमी उपचार एम्स मध्येच झाले.एम्स हे केंद्र सरकारचे रुग्णालय आहे.एक देशाचा पंतप्रधान कोणतेही देशातील खाजगी अथवा परदेशातील रुग्णालयात हक्काने उपचार करुन घेवू शकला असता पण अटलजी हे नाम निराळे होते .

माजी राष्ट्रपती डाॕ ऐ.पी.जे. कलाम यांच्या नंतर अटलजी हे दोघे चारित्र्य जपत देशाची सेवा किती निस्वार्थी पणाने केली हे प्रत्येक राजकारणात जाणाऱ्या व्यक्तीने शिकावे असे आहे.

डाॕ सुनिलसिंग राजपुत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page