‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये शंकरराव चव्हाण यांना अभिवादन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेद्र दादा चव्हाण, शंकरराव चव्हाण अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. योगिनी सातारकर, प्रा. डॉ. पी. विठ्ठल, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. उपकुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page