संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कर्मचा-यांसाठी शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे आयोजन

पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाचा उपक्रम

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने विद्यापीठातील सर्व कर्मचा-यांसाठी शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 29 जानेवारी पासून 3 फेब्राुवारी पर्यंत सदर शिबीर चालणार आहे. शिबीर संदर्भात सर्व शैक्षणिक, प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनाही सूचित करण्यात आले असून, अधिक माहितीकरीता पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांचेशी संपर्क साधता येईल.

शिबिरात सर्वांनी आपली शारीरिक कार्यक्षमता तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com