पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : बदलती राजकीय आव्हाने आणि समकालीन परिदृश्य” या विषयावर दि . 9 व 10 फेब्रुवारी ,2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे .

Advertisement
Organized National Workshop at Pandit Jawaharlal Nehru College

या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ शुजा शाकीर यांच्या हस्ते होणार आहे . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . संजय मून असणार आहे . कार्यशाळेचे बीजभाषण डॉ . विकास सिंह राज्यशास्त्र विभाग प्रमुख सिमला विद्यापीठ सिमला हे करणार आहे . या कार्यशाळेत अनेक तज्ञ आपले विचार मांडणार आहेत . अशी माहिती प्राचार्य डॉ . संजय मून, उपप्राचार्य डॉ . एस आर मंझा कार्यशाळेचे संयोजक डॉ पंडित नलावडे , प्रा . दिगंबर गंगावणे यांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page