मुक्त विद्यापीठात ‘दिव्यांगाप्रती सुगम्यता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
नाशिक : भारत सरकार द्वारा दिव्यांग सशक्तीकरण विभागाअंतर्गत दि ३ डिसेंबर २०१५ पासून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आलेले आहे. तसेच दरवर्षी मे महिन्यातील तिसरा गुरुवार वैश्विक सुगम्य जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाने गुरूवार, दिनांक 16 मे 2024 रोजी दुपारी 3:00 वाजता विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात ‘दिव्यांगाप्रती सुगम्यता’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचा उद्देश्य सर्वांसाठी सुलभ भौतिक वातावरण निर्माण करणे आहे. सुगम्य भारत अभियान अंतर्गत दिव्यांगांसाठी अनुकूल इमारती, मानव संसधान, वाहतूक वाहने, स्थानके, पूर्णपणे अनुकूल केली जातील अशी ध्येये लक्षात ठेवून हे अभियान कार्य करत आहे. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण (२०२०) नुसार सर्व विद्यार्थ्यांना मुख्यप्रवाहात सामावून घेण्यासाठी शिक्षकांना याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखाअंतर्गत कार्यान्वित असलेले दिव्यांग अध्ययन केंद्रामार्फत विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा संचालक, प्रा. जयदिप निकम यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच कुलसचिव दिलीप भरड, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक प्रा संजीवनी महाले यांच्या उपस्थितीत वैश्विक सुगम्य जागरुकता दिन साजरा करीत आहोत. त्यासाठी व्याख्याते म्हणून दिव्यांग अध्ययन केंद्र आणि समावेशित शिक्षण या विभागातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील समन्वयक धनंजय भोळे हे उपस्थित राहणार आहेत.
या व्याख्यानातून विद्यापीठाअंतर्गत कार्यान्वित अभ्यासकेंद्रावरील प्रवेशित विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिव्यांगासाठी सुगम्यता आणण्यासाठी वापरली जाणारी नवनवीन तंत्रसामग्री, साधन, सॉफ्टवेअर इ बाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल. तसेच हे व्याख्यान दिव्यांगाना उपयोगी असणारे समावेशित तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.
सदर व्याख्यानास ऑनलाइन पद्धतीने इतरांनाही उपस्थित राहता यावे, याकरीता मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत यु-ट्युब चॅनेलवर @ycmouofficialyoutubechanne5755 जाऊन Live पर्याय निवडता येईल.