सौ के एस के महाविद्यालयात एकदिवसीय ऑनलाईन मतदार नोंदणी उपक्रम संपन्न
बीड : नवगण शिक्षण संस्थेच्या सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नवगण शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यशास्त्र, लोकप्रशासन विभागा अंतर्गत चालविल्या जाणार्या निवडणूक साक्षरता मंडळा अंतर्गत एक मतदार लोकशाहीचा आधार या निवडणूक आयोगाच्या उपक्रमा अंतर्गत ऑनलाईन नवमतदार नोंदणी हा भव्य उपक्रम संपन्न झाला. यात 328 नवमतदारांनी नोंदणी केली असून त्यांना तात्काळ मतदार नोंदणी पावतीचे वाटप करणयात आले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, संस्थेचे पदाधिकारी डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान ए एस, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर हे उपस्थित होते. तर लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ पी बी इरलापल्ले, प्रा गणेश कदम, डॉ पांडूरंग सुतार, प्रा संजय मोरे, प्रा पांडूरंग केदार यांनी या नवमतदार नोंदणीसाठी परिश्रम घेतले.