शिवाजी विद्यापीठात ग्रंथालय व माहितीशास्त्र वर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचेआयोजन २१ जुलै रोजी
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषद दि. २१ जुलै २०२३ रोजी आयोजित केली आहे.
‘रिवॅम्पिग लायब्ररीज् इन मॉडन एरा’ याविषयावरील परिसंवादात आधुनिक कालखंडातील ग्रंथालय शास्त्र व ग्रंथालयाच्या बदलत्या स्वरुपांचा अभ्यास होणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी नाविन्यपूर्ण सेवेसाठी तसेच ग्रंथालय क्षेत्रातील तंत्रज्ञ, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार संसाधने, माहितीसेवा कशी अद्ययावत केली जावी या संबंधी चर्चासत्र होणार आहे.यापरिसंवादामध्ये संशोधन पत्रिकांचे सादरीकरण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी संसाधन प्रमुख म्हणून संत गाडगेबाबाअमरावती विद्यापीठ, ज्ञानस्त्रोतकेंद्राचे माजी संचालक डॉ. मोहन खेरडे, पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील माजी प्राध्यापक डॉ.राजेंद्र कुंभार तसेच कर्नाटक विद्यापीठ धारवाड, येथील सहयोगी प्राध्यापक प्रो. गुरुराज हडगली उपस्थित राहून मार्गदर्शन करणारआहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासंबधीची विस्तृत माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे किंवा समक्ष भेटून परिसंवादास नोंदणी करण्याचे आवाहनपरिषद संयोजक यांनी केलेआहे.
यापूर्वीविभागामार्फत कोरोना काळात काही ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले होते. कोरोना काळानंतर प्रथमच राष्ट्रीय परिषद प्रत्यक्षात भरविण्यात येत आहे याचा ग्रंथालय क्षेत्रातील सर्व इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन परिषदेचे आयोजन सचिव डॉ. पी.बी.बिलावर, उपग्रंथपाल , शिवाजी विद्यापीठ यांनी केले आहे.