यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुनर्परीक्षार्थीसाठी १ ऑक्टोबर शेवट
१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याचे आवाहन
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) विविध शिक्षणक्रमांच्या ( कृषी पदविका वगळता ) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षा संभाव्यतः २३ डिसेंबर २०२५ पासून होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने कळविल्यानुसार, अनुत्तीर्ण विषयांचा परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची विनाविलंब शुल्काची अंतिम मुदत १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ अशी आहे.
अर्ज सादर करण्याच्या पुढील तारखा पुढीलप्रमाणे आहेत:
- विलंब शुल्कासह: २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५
- विशेष विलंब शुल्कासह: ८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२५
यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परीक्षा अर्ज भरण्यासाठी अधिकृत लिंक:
https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2_ExamformSubmission_PpAmAtWise.aspx
परीक्षा शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागेल.
परीक्षेचे अद्ययावत वेळापत्रक व इतर माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी:
https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1494
अडचण आल्यास विद्यार्थी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा:
०२५३–२२३०७३४
९२०९५७६३३७
(सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत उपलब्ध)
ही माहिती परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी प्रसिद्ध केली आहे.
