आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र-2024 च्या लेखी परीक्षेस 1864 विद्यार्थी प्रविष्ठ
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 2024 मधील पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षांना दि 05 ऑक्टोबर 2024 पासून प्रारंभ होत आहे. विद्यापीठाच्या हिवाळी सत्र -2024 मधील टप्पा -1 मधील MDS & First year BDS च्या लेखी परीक्षेचे संचलन दि 05 ते 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यातील एकूण 29 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहेत.
सदर परीक्षेस एकूण अंदाजे 4329 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रविष्ठ होणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठ उन्हाळी-2024 टप्पा-2 मधील प्रथम वर्ष एम बी बी एस 2019/2023 पुरवणी लेखी परीक्षेचे संचलन दि 14 ते 25 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यातील एकूण 40 परीक्षा केंद्रावर संचलीत होणार आहे. सदर परीक्षेस एकूण अंदाजे 1864 विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रविष्ठ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या हिवाळी-2024 व उन्हाळी-2024 टप्पा-2 परीक्षेबाबत विद्यापीठाचे www.muhs.ac.in/ अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.